LYRIC


Lavthavati Vikrala(लवथवती विक्राळा) (Marathi) Lyrics by Mohan, Ashvini, Vivek, Pratap, Sanja.

Lavthavati Vikrala(लवथवती विक्राळा) (Marathi) Lyrics

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा
विषे कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा
लावण्यसुंदर मस्तकी बाळा
तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा

जयदेव जयदेव जय श्री शंकरा
आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा

कर्पूरगौरा भोळा नयनी विशाळा
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा
विभुतीचे उधळण शितिकंठ निळा
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा

देवी दैत्यी सागर मंथन पैं केले
त्यामाजी अवचित हलाहल जे उठले
ते त्वा असुरपणे प्राशन केले
नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले

व्याघ्राम्बर फणिवरधर सुंदर मदनारी
पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी
रघुकुलतिलक रामदासा अंतरी


SONG INFO:

Song: Lavthavati Vikrala(लवथवती विक्राळा) (Marathi)
Singer: Mohan, Ashvini, Vivek, Pratap, SanjaAdded by

lyricsmin

SHARE

ADVERTISEMENT

VIDEO